Ad will apear here
Next
६५व्या वर्षी मॅरेथॉन जिंकणाऱ्या लता भगवान करेंची संघर्षगाथा चित्रपट रूपात

पुणे : एखादी सामान्य व्यक्तीही रोजच्या जगण्याचा संघर्ष करत असताना एखादी अफाट कामगिरी करून जाते आणि सारी दुनिया थक्क होते. अशीच एक प्रकाशझोतात आलेली व्यक्ती म्हणजे ६५ व्या वर्षी अनवाणी पायाने धावून बारामतीतील शरद मॅरेथॉन जिंकणाऱ्या लता करे. त्यांच्या आयुष्यावर ‘लता भगवान करे - एक संघर्षगाथा’ हा चित्रपट निर्माण करण्यात आला असून, येत्या १७ जानेवारी २०२० रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. 

या पोस्टरवर एक उतारवयातील स्त्री शेतामध्ये शून्यात नजर लावून बसलेली आहे. त्या शेताला धावण्याच्या मैदानाचे स्वरूप देण्यात आले आहे. 

परमज्योती फिल्म्स क्रिएशन्स प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन नवीन देशबोईना यांनी केले आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे लता करे स्वतःच मुख्य भूमिकेत असून, त्यांच्या कुटुंबीयांनी म्हणजेच भगवान करे, सुनील करे यांनीही यात अभिनय केला आहे. याशिवाय रेखा गायकवाड, राधा चव्हाण, अजय शिंदे, बालकलाकार साक्षी यांच्याही भूमिका आहेत.

आराबोथु कृष्णा यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाला प्रशांत महामुनी यांचे संगीत असून, पार्श्वसंगीत कन्नू समीर यांनी दिले आहे. मेकअप शीतल कांडरे व छायांकन आदित्य सणगरे, कमलेश सणगरे यांनी केले आहे, तर संकलक बोद्दू शिवकुमार, स्थिर छायांकन प्रतिक कचरे यांनी केले आहे. चित्रपटाचे कार्यकारी निर्माता अतुल साबळे, तर निर्मिती व्यवस्थापक प्रवीण बर्गे आहेत. ध्वनीमुद्रण वेंपती श्रीनिवास यांनी व डीआय गोविंद कट्टा यांनी केले आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZQPCH
Similar Posts
‘आई कुठे काय करते’ : आईच्या भावविश्वाचा वेध घेणारी नवी मालिका पुणे : व्यापता न येणारं अस्तित्व आणि मोजता न येणारं प्रेम म्हणजे आई. तिच्या निर्व्याज प्रेमाची परतफेड करणं अशक्य आहे. आपल्याआधी तिचा दिवस सुरू होतो. सर्वांच्या आवडी-निवडी, कामाच्या वेळा, थोरामोठ्यांची काळजी आणि घर जपताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे विसरते. तसं पाहिलं तर गृहिणीच्या कामाचं आणि तिच्या त्यागाचं कोणतंही मोल नसतं
अमेरिकन सरोदवादक केन झुकरमन यांनी उलगडली कारकीर्द पुणे : गिटार वाजवत असताना आणि भारतीय शास्त्रीय संगीताचा गंधही नसताना सरोदने घातलेली भुरळ, प्रथम सतार शिकण्यास केलेली सुरुवात आणि पुन्हा सरोदच्या शिक्षणाकडे वळलेले पाय आणि सरोदलाच वाहून घेण्याचा मनाने घेतलेला निर्णय… अमेरिकेतील प्रख्यात सरोदवादक केन झुकरमन यांनी आपला प्रवास ‘सवाई’च्या ‘अंतरंग’ कार्यक्रमात उलगडला
पुण्याच्या ओंकार मोदगीचा लघुपट एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुणे : पुण्यातील पटकथालेखक व दिग्दर्शक ओंकार मोदगी याच्या ‘डोगमा’ या लघुचित्रपटाची लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या एशियन फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड झाली आहे. गुरुवारी, १२ डिसेंबर रोजी लॉस एंजिलिसमध्ये हा लघुचित्रपट दाखवला जाणार आहे.
‘सवाई गंधर्व’ महोत्सवात झंकारले सरोद-सतारचे सूर पुणे : केडिया बंधूंचे सतार आणि सरोद सहवादन, पंडित शिवकुमार शर्मा यांचे सुरेल संतूरवादन आणि संदीप भट्टाचारजी, मंजिरी आलेगावकर यांच्या सुस्वर गायकीने सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रसिकांना तृप्त केलं.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language